अभिनेत्री विद्या बालनचा ‘जलसा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईः  बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या अगामी चित्रपट ‘जलसा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जलसा’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. १८ मार्चला होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट   प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट खूप खास असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये विद्या आणि शेफाली शाह यांची जोडी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे.

“स्मिताच्या चेहऱ्यामागे खरी कहाणी आहे. जलसा १८ मार्चला रिलीज होणार आहे. मी खूप उत्साहित आहे.” विद्याची ही कहाणी अनेक अर्थांनी खास असणार आहे. त्याचबरोबर शेफालीचा जबरदस्त लूकही पाहायला मिळणार आहे. ‘जलसा’ चित्रपटात विद्या बालन पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, दुसरीकडे शेफाली शाह ‘शेफ’च्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये दोघींचा सिंपल लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

Share