अल्लू अर्जुनला जाहिरात भोवली! पोलिसात तक्रार दाखल

मुंबई : एका शैक्षणिक संस्थेचे समर्थन करणारी जाहिरात टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनला भोवली आहे. अल्लू अर्जुनच्या विरोधात त्या जाहिरातीत सहभाग घेतल्याप्रकरणी तसेच संबंधित शैक्षणिक संस्थेच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या वर्षी त्याचा ‘पुष्पा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. ‘पुष्पा’ ला बॉक्स ऑफिसवरदेखील मोठे यश मिळाले. सोशल मीडियावर तर ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्याचे, संवादाचे मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते. आता अल्लू अर्जुन एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. एका उत्पादनाची जाहिरात करताना त्याने ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/CcX5nsNPycX/?utm_source=ig_web_copy_link

एका शैक्षणिक संस्थेचे समर्थन करणारी जाहिरात अल्लू अर्जुनला भोवली आहे. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. सदर जाहिरातीमध्ये अल्लू अर्जुनचा चेहरा वापरण्यात आला असून प्रत्यक्षात जाहिरातीतून मिळणारा संदेश हा फसवणूक आणि भ्रम निर्माण करणारा आहे, असे दिसून आले आहे. म्हणून अल्लू अर्जुनच्या त्या जाहिरातीवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उपेंद्र रेड्डी यांनी केली आहे. अल्लू अर्जुनने त्या जाहिरातीत सहभाग घेतल्याप्रकरणी तसेच संबंधित शैक्षणिक संस्थेच्या विरोधात अंबरपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते उपेंद्र रेड्डी यांनी अल्लू अर्जुन आणि संबंधित शिक्षण संस्थेवर खटला चालवण्याची मागणी केली आहे. एखाद्या जाहिरातीवरून ट्रोल होणे तसेच त्या कलाकारावर कारवाई होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील टॉलिवूड आणि बॉलिवूडच्या काही अभिनेत्यांवर कारवाई झालेली आहे.

यापूर्वी अल्लू अर्जुनवर एका फुड डिलिव्हरी अॅपच्या मार्केटिंग सेवेची जाहिरात केल्यानंतर त्याच्यावर टीका करण्यात आली होती. शासकीय सेवेतील वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याऐवजी एका खासगी वाहतूक सेवेची प्रशंसा केल्याबद्दल नाराजीही नेटकऱ्यांनी व्यक्त केली होती.

Share