आलियाने दिली गोड बातमी; कपूर कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आज आलियाने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. आज सकाळी आलियाला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी भरती करण्यात आलं. या ठिकाणी आलियाने आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. आई व नवजरत चिमुकली दोन्हींची प्रकृती उत्तम असल्याचं कळतंय.

आज सकाळी रणबीर-आलिया मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलबाहेर दिसलं होतं. याचक्षणी आलिया कोणत्याही क्षणी बाळाजा जन्म देणार, हे स्पष्ट झालं होतं. पाठोपाठ नीतू सिंग, आलियाचे आई बाबा सोनी राजदान व महेश भटही रूग्णालयात पोहोचले. यानंतर काहीच तासांत आलियाने कन्यारत्नाला जन्म दिला.

Share