गृहमंत्र्यांनी केली ओवेसींना हि विनंती…

दिल्ली- उत्तर प्रदेशातील हापूर येथे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबारप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत उत्तर दिले. ते म्हणाले की, ओवेसी यांचा हापूर जिल्ह्यात कोणताही पूर्वनिर्धारित कार्यक्रम नव्हता आणि त्यांच्या आंदोलनाची कोणतीही माहिती यापूर्वी जिल्हा नियंत्रण कक्षाला पाठवण्यात आली नव्हती. शाह म्हणाले की, दोन अज्ञात व्यक्तींनी ताफ्यावर गोळीबार केला होता.  ओवेसींवर किंवा यात कोणतिही जीवीत हानी झालेली नाही.  पण त्यांच्या गाडीच्या तळाशी ३ गोळ्यांच्या खुणा आहेत. ही घटना तीन साक्षीदारांनी पाहिली. तत्परतेने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन अनधिकृत पिस्तूल आणि एक अल्टो कार जप्त करण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीम कार आणि घटनास्थळाची कसून चौकशी करत असून  पुरावे गोळा करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

सुरक्षा घ्या आणि आमची चिंता संपवा: अमित शाह
अमित शाह पुढे म्हणाले की, आम्ही ओवेसींना सुरक्षा देऊ केली होती पण त्यांनी ती नकारली आहे. मी पुन्हा एकदा ओवेसींना विनंती करतो की सरकारने दिलेली सुरक्षा घ्या आणि आमची चिंता संपवा. शाह म्हणाले की, यापूर्वी अनेक वेळा केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या मूल्यांकनानंतर केंद्र सरकारने ओवेसींना सुरक्षा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र ओवेसी यांनी नकार दिला आहे . त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्याचे दिल्ली पोलिस आणि तेलंगणा पोलिसांचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत.

Share