लवकर झोपतो आणि लवकर उठने आरोग्यासाठी लाभदायी

लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे. याचा अर्थ जो लवकर झोपतो आणि लवकर उठतो त्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व धनसंपदा लाभते. त्यामुळे धर्मशास्त्रात सांगितले आहे ये की लवकर झोपणे हेच आरोग्यासाठी चांगले आहे.

उत्साही उत्साही वाटते
सकाळी लवकर उठणारे लोक फार उत्साही आणि कार्यक्षम असतात. कारण जे लोक दिवसाची सुरूवात ब्रम्हमुहुर्तावर करतात त्यांची बुद्धी अतिशय तल्लख आणि तेजस्वी असते. ‘ब्रम्हमुहुर्त’ म्हणजे रात्रीचा चौथा प्रहर आणि सुर्योदया आधीचा पहिला प्रहर. दिवसाच्या चोविस तासात एकुण तीस मुहुर्त असतात. यापैकी तिसावा मुहुर्त हा ब्रम्हमुहुर्त असतो. या ब्रम्हमुहुर्ताला अतिशय महत्व आहे. साधारणपणे पावणे तीन ते पावणे पाचच्या दरम्यान ब्रम्हमुहुर्त असू शकतो. या वेळी एखाद्या गोष्टीचा अभ्यास,प्रार्थना, चिंतन,मनन, ध्यान करणे फार फायदेशीर ठरते. वास्तविक माणसाचे शरीर चक्र हे सुर्यानुसार चालते. त्यामुळे सकाळी उठल्यामुळे निसर्गनियमानुसार तुम्हाला फ्रेश वाटते.

आनंद मिळतो
जी माणसे उत्साही आणि सशक्त असतात ती नेहमीच आनंदी राहतात. म्हणूनच जर तुम्ही सकाळी लवकर उठला तर तुम्हाला उत्साही आणि आनंदी वाटते.

आत्मविश्वास वाढतो
सकाळी लवकर उठल्यामुळे तुमची कामे वेळत पूर्ण होतात. काम वेळेत झाल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास अधिक वाढतो.

सकारत्मक विचारसरणी
सकाळचे वातावरण अतिशय शांत आणि निवांत असते. अशा वेळी उठून आपली नित्याची कामे सुरू केल्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटते. जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा याचा चांगला परिणाम तुमच्या विचारसरणीवर होतो. मनात चांगले आणि हिताचे विचार येतात. जे तुमच्या दिवसाच्या सुरूवातीसाठी अतिशय उत्तम असतात. याउलट उशीरा उठल्याने कामाचा ताण वाढतो. ज्यामुळे दिवसभर चिडचिड आणि कंटाळा येऊ शकतो.

व्यायामासाठी वेळ मिळतो

रात्री गाढ झोप येते
अनेकांना रात्री झोप न येण्याची समस्या सतावत असते. ज्यांना निद्रानाशाची समस्या असेल त्यांनी सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. कारण जे लवकर उठतात त्यांना रात्री लवकर आणि निवांत झोप लागते. शिवाय लवकर उठल्यामुळे दिवसभराची कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे रात्री झोपताना कामाचा ताण अथवा चिंता सतावत नाही.

ताण-तणाव दूर होतो
जर तुम्ही सकाळी लवकर उठला तर तुमची कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे तुम्हाला कामाचे टेंशन येत नाही. शिवाय कामे वेळेत झाल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकता. कुटुंब आणि प्रिय व्यक्तीसोबत गुजगोष्टी करत दिवसाची सुरूवात केल्यामुळे तुमच्या मनात सुखद भावना निर्माण होतात.

कार्यक्षमता वाढते
रात्रीभर पुरेशी झोप झाल्यामुळे मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे सकाळी लवकर उठल्यावर तुमचा मेंदू अधिक कार्यक्षम होतो. एखादे काम करताना तुम्हाला थकवा अथवा कंटाळा येत नाही. जे काम करता ते पूर्ण लक्ष देऊन केल्यामुळे तुम्हाला लवकर यश मिळते. जर तुम्हाला जीवनात लवकर यशस्वी व्हायचं असेल तर लवकर उठणं फायदेशीर ठरू शकतं.

भुक चांगली लागते
सकाळी लवकर उठून व्यायाम केल्यामुळे तुम्हाला चांगली भुक लागते. सकाळी पुरेसा वेळ असल्यामुळे तुम्ही वेळेवर आणि पौष्टिक नाश्ता करू शकता. ज्यामुळे दुपारी आणि रात्री वेळेत भुक लागते आणि तुम्ही व्यवस्थित जेवता. ज्यामुळे तुम्ही जंकफूड आणि अहितकारक पदार्थ खाणे टाळता.

आजारपणापासून बचाव होतो
सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामाचे योग्य नियोजन करू शकता. पूजापाठ, ऑफिसला जाण्याची तयारी, नास्ता तयार करण्यासाठी पुरेसा वेळ असल्यामुळे तुम्ही तुमच्या व्यायामासाठी वेळ काढू शकता. सकाळच्या वेळी चालणे, धावणे, योगासने केल्यामुळे दिवसभर तुमचे शरीर कार्यक्षम राहते.

वेळेचा सदुपयोग होतो
झोप आणि दिवसभराची कामे यांचे गणित चुकल्यामुळे तुमची दिवसभर चिडचिड होत असेल तर सकाळी लवकर उठा. कारण लवकर त्यामुळे तुमची कामे लवकर पूर्ण होतील. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्ही कामाचे नियोजन करू शकता. ज्यामुळे तुम्ही दिवसाच्या चोविस तासांचा योग्य सदूपयोग करू शकता.वाटते

Share