जाणून घ्या, बेलाच्या फळाचे आरोग्य फायदे

बेलाच्या फळाच्या फायद्याविषयी क्वचितच लोकांना माहित असेल. काही लोकांना बेल केवळ महादेवाला अर्पित करण्यासाठी वापरले जाते एवढेच माहित आहे. त्यामुळे याच्या फळाचा फायदा खूप कमी लोकांना माहित आहे. परंतु बेलाचे फळ औषधी म्हणून वापरले जाते. बेलाच्या फळाचे शरबत तुम्हाला थंडाई आणि ताजतवाण वाटण्यासाठी फायदेशीर आहेच, मात्र आरोग्याशी संबंधित समस्यासुध्दा दूर करते. परंतु गर्भावस्थेत याचे सेवन करणे नुकसानदायक ठरू शकते. जाणून घेऊया बेलाच्या फळाचे फायदे

मधुमेह कंट्रोल अन् तोंडाला फोड
मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय लाभदायी आहे. बेलाच्या पानांचा रस काढून दिवसाला दोन वेळा घेतल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळविणे शक्य आहे. रोज याचे सेवन केल्यास याचा फरक दिसून येतो. पोटात समस्या निर्माण झाल्यास तोंडाला फोड येतात. अशा परिस्थितीत बेलाचा गर उकळून गुळण्या केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

अपचनापासून मुक्ती
पोटाच्या दुखण्यांवर बेलाचे फळ रामबाण औषध आहे. बहुतांश रोगांची सुरुवात पोटापासून होत असते. बेलाच्या नियमित सेवनाने अपचनापासून कायमची मुक्ती मिळणे शक्य आहे. पुढचे मोठे आजारा टाळणे शक्य आहे.

रक्ताची कमतरता दूर
बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेचे लक्षण दिसून येतात. वाळलेल्या बेलाच्या गराचा पावडर तयार करून गरम दुधात मिश्रीसोबत रोज एक चम्मच घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते. आपणास आरोग्यदायी अनुभव यायला लागतो.

गर्भवती महिलांसाठी
गर्भवती महिलांना उलट्यांचा त्रास सर्वसामान्य मानला जातो. या त्रासापोटी अनेकदा जेवण बंद केले जाते. त्याचा परिणाम बाळावर होऊन पुढच्या त्रास वाढतो. डॉक्टरही गोळ्या देत असतात. पण, या समस्येवर बेल सर्वोत्तम उपाय आहे. बेलाचा गर कुटून तांदळाच्या पाण्यासोबत त्याचा लगदा तयार करावा. नंतर त्याची छाननी करून प्यावे.

डायरियापासून बचाव
उन्हाळ्याच्या दिवसात डायरिया ही समस्या आता अधिकांश लोकांमध्ये दिसून येते. अलीकडे या रुग्णांचे प्रमाण विदर्भात वाढीस लागले आहेत. या परिस्थितीत उलट्या, हगवण, मळमळ वाटू लागते. बेलाच्या पाण्यात साखर मिसळून प्यायल्यास याचे लाभ दिसून येतात. हे केल्यास आतून आरोग्यवर्धक अनुभव मिळतो.

ऊन लागल्यास
विदर्भातील पारा ४८ पार जातो. दरवर्षीचा हा अनुभव असल्याने अनेकांना ऊन लागते. हा त्रास सुरू झाल्यास बेलाच्या ताज्या पानांना कुटून मेहंदीप्रमाणे तळपायावर लावावे. त्याशिवाय डोके, हात, छातीवरही याची मा‌लिश करावी. मिश्री टाकून बेलाचा शरबत प्यायल्यास तत्काळ आराम मिळतो.

Share