अमित ठाकरे म्हणजे कार्यकर्त्यांना सोडून घरी बसलेला गृहमंत्री – दिपाली सय्यद

मुंबई : गेल्या काहीदिवसांपासून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद सातत्याने मनसेवर हल्लाबोल करती आहेत. आज दिपाली सय्यद यांनी एक ट्विट करुन मनसेला पुन्हा एकदा डिवचलं आहे. मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती असल्याची टीका दिपाली सय्यद यांनी केली आहे.

दीपाली सय्यद आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, मनचे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती, अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडून घरी बसलेला गृहमंत्री. शॅडो कॅबिनेटने अयोध्याला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री, अशी टीका दीपाली सय्याद यांनी केली आहे.

 

तसेच, माननीय लोक पहिले बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे, वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे. माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये, असा सल्लाही दीपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून शिवसेनेतील सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत सेनेच्या ४० आमदारांनी भाजपसोबत राज्य सरकार स्थापन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्या प्रकरणी बंडखोरांवर कारवाईचं सत्र सुरु ठेवलं आहे. दिपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावी, अशी भूमिका घेतली आहे.

Share