राज्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून पूर परिस्थिती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फ एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई,(कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१)-२, पालघर-१,रायगड-महाड-२, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण-२,कोल्हापूर-२,सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ तुकड्या तैनात आहेत. नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती

राज्यात एक जून पासून आज पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे. राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल  देण्यात आला आहे.

या भागात यलो अलर्ट

महाराष्ट्रात आज२३ जुलै २०२२ आणि उद्या २४ जुलै २०२२ या दोन दिवशी निवडक जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पालघर, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये मंगळवार २६ जुलै २०२२ पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Share