अमृता खानविलकरने चक्क पुणे मेट्रोतच धरला ‘चंद्रा’वर ठेका

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहेया चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी हटके युक्ती निवडली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी अमृताने चक्क पुणे मेट्रोत ‘चंद्रा’ या गाण्यावर ठेका धरला आहे.

https://www.instagram.com/tv/Ccp_opcBGL5/?utm_source=ig_web_copy_link

अमृता खानविलकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अमृता खानविलकर ही पुणे मेट्रोत चंद्रा या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिच्यासोबत या मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या पुणेकरांनीही ठेका धरला आहे. या मेट्रोत प्रवास करणारे अनेक प्रवाशीही या ठिकाणी नाचताना दिसत आहेत. यावेळी अभिनेता आदिनाथ कोठारेही उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे चंद्रा या गाण्यावर नाचून झाल्यानंतर ती फार आनंदी असल्याचे पाहायला मिळत होते. तसेच पुणेकरांनी टाळ्या वाजवून अमृताच्या ‘चंद्रा’ गाण्याला दाद दिली. या प्रसंगी अमृता आणि आदिनाथ यांनी पुणेकरांना २९ एप्रिलला चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. सध्या चंद्रमुखी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे.

दरम्यान आपल्या मोहमयी नजाकतीने अमृताने या चित्रपटातील लावण्यातीने सर्वांचीच मने जिंकली. याला अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची साथ लाभली आहे. सध्या सोशल मीडियावर ‘चंद्रा’ या गाण्याच्या नृत्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. अमृता खानविलकर हिने ज्याप्रमाणे ‘चंद्रा’ प्रेक्षकांसमोर सादर केली. त्याला तोड नाही. तिची ही अदा पाहून सामान्य प्रेक्षकांसह अनेक मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही ‘चंद्रा’वर ठेका धरताना दिसत आहेत.


‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Share