मुंबई- मुंबईतील विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख झटका दिलाय. न्यायालयाने देशमुख यांचा मनी लाँडरिंग प्रकरणातील डिफॉल्ट बेलचा अर्ज फेटाळला आहे. सक्तवसुली संचलनालयाने अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली होती. ईडीने अनिल देशमुख आणि सचिन वाझेन हे मुख्य आरोपी असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी बार मालकांकडून खंडणी वसुल केली होती.
[BREAKING] Anil Deshmukh's default bail plea rejected by Mumbai court
report by @Neha_Jozie
#anildeshmukh @AnilDeshmukhNCPRead story: https://t.co/wS7NgPAIaD pic.twitter.com/gTBwFQ8oDT
— Bar & Bench (@barandbench) January 18, 2022
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला. जामीन अर्जात देशमुख यांनी आपल्याला न्यायालयीन कोठडीत पाठवल्याचा आणि क्रिमिनल प्रोसिजरनुसार त्याची ६० दिवसांची मर्यादा ओलांडली असल्याचा युक्तीवाद केला . यावेळी देशमुखांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ डिसेंबर २०२१ रोजी वाढ करून ती ९ जानेवारी २०२२ पर्यंत केल्याचंही म्हटल आहे .