बहुप्रतिक्षीत ‘झोंबिवली’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईः  झोंबिवली या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात सिनेमात अमेय वाघ, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर, जानकी पाठक आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत आहेत.येत्या २६ जानेवारी रोजी झोंबिवली सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत.

झोंबिवली चित्रपट हा ४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होतापण आता प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असून आता हा चित्रपट फेब्रुवारीच्या आधीच म्हणजे २६ जानेवारीला रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काहीसा हॉरर आणि तितकाच धमाल उडवून देणारा ‘झोंबिवली’ सिनेमाचा ट्रेलर आहे. ट्रेलमधील काही सीन भीतीदायक वाटतात तर काही संवाद मात्र हसायला भाग पाडतात.

https://www.instagram.com/p/CY1IYZpPE8y/?utm_source=ig_web_copy_link

झोंबिवली या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. “आम्ही पाच, पडणार झोंब्यांवर भारी! २६ जानेवारीला येतोय करून सगळी तयारी”, अशी पोस्ट करत अमेय वाघने सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 

Share