महाराष्ट्रात पुन्हा घातपात? श्रीवर्धनमध्ये बोटीत एके-४७ आढळल्या

रायगड : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये समुद्र किनाऱ्यावर एक बोट संशयास्पद स्थितीत आढळून आली आहे. या बोटीत शस्त्रास्त्रं सापडली आहेत. पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलिसांनी रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. तर, दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट शस्त्रांसह आढळून आल्याने गंभीर बाब समजली जात आहे. पोलिसांनी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर म्हणाले की, श्रीवर्धन समुद्रकिनारी र संशयास्पद बोटी आढळल्या आहेत. या बोटींमध्ये ३ एके ४७ आणि २२५ राऊंड्स, कॉन्फरन्स टेबल, कॅम्प्युटर आढळले आहेत. काही ग्रामस्थांनी बोट काढण्याचा प्रयत्न केला. काही एके-४७ बंदुका आढळून आल्या आहेत. नेपच्युन सिक्युरिटी मेरेटाइन असं बोटीवर लोगो आहे. पोलीस तपास करत आहेत. संबंधित कंपनीची ही स्पीड बोट असावी अशी शक्यता आहे. त्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयास्पद गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत.

Share