पंजाब मंत्रिमंडळाची २५ हजार सरकारीपदे भरण्यास मंजुरी

पंजाब-  पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्या  मंत्रिमंडळाने शनिवारी घेतलेल्या पहिल्याच बैठकीत   पोलीस दलातील १० हजार पदांसह राज्याच्या वेगवेगळ्या खात्यातील २५ हजार रिक्त पदे भरण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवल्यानंतर मान यांनी या निर्णयाची घोषणा केली. या पदांसाठी जाहिरात व त्याबाबतची अधिसूचना जारी करण्याची प्रक्रिया एका महिन्याच्या आत सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ‘निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासनेही येत्या काही दिवसांत आम्ही पूर्ण करू, असे ते म्हणाले आहेत.

१० हजार नोकऱ्या पंजाब पोलिसांना, तर उर्वरित नोकऱ्या इतर खाती, मंडळे व महामंडळांमध्ये दिल्या जातील. या नोकऱ्या गुणवत्तेच्या आधारावर देण्यात येतील आणि त्यात कुठलाही पक्षपात, शिफारस किंवा लाच यांना वाव राहणार नसल्याच, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Share