मलिकांच्या समर्थानातील आंदोलनाला सेनेची दांडी !

औरंगाबाद-  नवाब मलिकांना ईडीने अटक केल्या नंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यातच औरंगाबादमध्ये आज धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी आंदोलनाला शिवसेनेचे मोजकेच नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पण माध्यमांनी लक्ष वेधताच तात्काळ शिवसेनेचे रुमाल आणून कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालून, सावरासावर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शहरातील क्रांती चौकात सकाळी १० वाजेच्या सुमारास धरणे आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी आंदोलनात काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे झेंडे पाहायला मिळाले. पण शिवसेनेचा ना झेंडे होते ना कार्यकर्त्यांची गर्दी होती. मोजके नेते आणि मोजके पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या आंदोलनापासून शिवसेना कार्यकर्त्यांनी दूर राहणे पसंद केले.

दरम्यान आंदोलनावेळी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटिल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share