तुरटीचे कधीही न ऐकलेले अफलातून फायदे

तुरटी हा पांढरा शुभ्र रासायनिक पदार्थ आहे. जे दिसायला एखाद्या खडी साखरेच्या स्पटिका प्रमाणे दिसतो. तुम्हाला दातांच्या काही समस्या असतील तर तुरटी हा त्यावर रामबाण उपचार आहे. तुरटी सामान्यपणे पाणी शुद्ध व स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येते.पण या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी व सौंदर्य वाढवण्यासाठी देखील तुरटीचा अनेक प्रकारे वापर करु शकता.अगदी अॅक्नेपासून ते मसल क्रॅम्प पर्यत अशा अनेक आरोग्य समस्यांवर तुरटी फायदेशीर ठरते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुरटी तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होऊ शकते व ती स्वस्त देखील असते.

  • Canker sores वर उपचार करण्यासाठी
    जर तुम्हाला वेदनादायक Canker sores चा त्रास होत असेल तर तुम्ही त्यावर तुरटीचा वापर करु शकता.तुरटी ही अॅन्टीबॅक्टेरियल असल्यामुळे इनफेक्शन कमी होण्यास मदत होते व लवकर आराम मिळतो.
  • माऊथवॉश म्हणून वापर करण्यासाठी
    तोंडाला दुर्गंध येण्याचे एक कारण तोंडामधील बॅक्टेरिया असून त्यामुळे अॅसिड व विषद्रव्ये निर्माण होतात.तुरटीच्या माऊथवॉश ने चुळ भरल्यामुळे तोंडातील बॅक्टेरियांचा नाश होतो व बॅक्टेरियाच्या वाढीला विरोध होतो
  • केसांमधील उवांसाठी
    केसांतील उवा व त्याची अंडी या समस्येवर तुरटी हा एक जुना उपाय आहे.तुरटीमधील अॅन्टीबॅक्टेरियल व अॅस्ट्रीजंट गुणधर्मामुळे उवा नष्ट होतात.
  • पिंपल्स कमी करण्यासाठी
    अ‍ॅक्ने,पिंपल्स व स्कार्स वर मुलतानी माती,एग व्हाइट व तुरटीचे मिश्रण फार परिणामकारक आहे.तुरटीमधील अॅन्टीसेप्टीक घटकांचा या समस्येला दूर करण्यास चांगला फायदा होतो.तसेच या उपायांंनी मिळवा अ‍ॅक्नेच्या समस्येपासून कायमची सुटका
  • आफ्टर शेव्ह लोशनसाठी
    अनेक महागड्या आव्हर शेव्हलोशन पेक्षा तुरटी प्रभावी असते.फार पूर्वीपासून तुरटीचा आव्हर शेव्ह लोशनसाठी वापर करण्यात येतो.तुरटीमुळे तुमची त्वचा मऊ होते व त्वचेचा पोतही सुधारतो.शेव्ह करताना कापले गेल्यास रक्त थांबण्यासाठी देखील तुरटीचा वापर करण्यात येतो.
  • प्री-मॅच्युअर एजींग पासून वाचण्यासाठी
    तुरटीमध्ये अॅन्टी-एजींग घटक असल्यामुळे तुरटीचा वापर केल्यामुळे तुम्ही लवकर वृद्ध दिसत नाही व तुमची त्वचा मऊ व तजेलदार होते.
  • नैसर्गिक डिओड्रंट
    जर तुमच्या शरीराला दुर्गध येत असेल तर त्यावर देखील तुम्ही तुरटीचा वापर करु शकता.तुटरीमुळे तुमच्या शरीरावर घामामुळे निर्माण होणारे बॅक्टेरिया नष्ट होतात व तुम्हाला ताजे वाटू लागते.तुरटी अॅन्टीबॅक्टेरियल असल्यामुळे नॅचरल डिओड्रंट म्हणून उपयोगी पडते.तसेच परफ्युम विकत घेताना तो बनावट नसल्याचे तपासण्यासाठी ’8′ खास ट्रीक्स !जरुर वाचा.
Share