केजीएफ २ ला टक्कर देणाऱ्या बीस्टला कुवैतमध्ये बंदी

दाक्षिणात्य अभिनेता थालापती विजयचा आगामी चित्रपटा बीस्टवर कुवैतमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कुवैतने या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा निर्णय  घेतला आहे. हा चित्रपट त्यांच्या देशासाठी योग्य नाही असे कुवैत सरकारने म्हटलय,ज्या चित्रपटांमध्ये अरब देशांत दहशतवाद्यांचे अड्डे दाखवले जातात, त्या सर्व चित्रपटांवर तेथे बंदी घालण्यात आली आहे. ‘बीस्ट’च्या आधीही कुवैत सरकारने दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमानच्या ‘कुरूप’ आणि विष्णू विशालच्या ‘एफआयआर’ या चित्रपटांवर बंदी घातली होती. १५०  कोटीच बजेट असलेल्या ‘बीस्ट’चे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. तर संगीत अनिरुद्ध रविचंदर यांचे आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि सेल्वा राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बीस्टमध्ये कॉमेडियन योगी बाबूही दिसणार आहे.

https://www.instagram.com/reel/CcCxWacIbQA/?utm_medium=share_sheet

 

Share