उन्हाळ्यात उपवास करताय, घ्या ही काळजी …..

चैत्र नवरात्रीचा सुरु आहे. आणि रमजान महिना सुरू झाला आहे. मुस्लिम बांधव रोजा ठेवतील. यावर्षी उष्णता जास्त आहे. अशा स्थितीत उपवास आणि रोजे करणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. जे लोक नियमित रक्तदाब (बीपी), शुगर, थायरॉईड इत्यादींसाठी औषधे घेतात, त्यांनी ती घेणे थांबवू नये.
या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना माहीत आहेत. असे असूनही काहीजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हे देखील लक्षात ठेवा, की उपवासाचे काही नियम आहेत, जे पाळले पाहिजेत.
उपवास आरोग्यासाठी चांगला मानला जातो. कारण हा पचनसंस्थेला आराम देतो आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो.
उपवास फक्त धार्मिक प्रसंगीच केला पाहिजे असे नाही. शरीर आतून स्वच्छ करण्यासाठीही उपवास आवश्यक आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते. मनही निरोगी राहते. नैराश्य आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्यास मदत होते. म्हणूनच धर्मग्रंथात उपवासाला धर्माशी जोडले गेले आहे. उपवास केल्याने मेंदूला विश्रांती मिळते असे म्हणतात. आजकाल लोक उपवासाच्या नावाखाली तळलेले पदार्थ खातात. हे करणे टाळा.
आता तुम्ही विचार करत असाल की विज्ञानानुसार उपवास कसा करता येईल?

त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा-
ज्यूस आणि पाण्यासोबत काही फळे खाऊ शकता. यामुळे शरीरात एन्झाइम तयार होते आणि अन्न सहज पचते.
उपवासाच्या दिवशी रात्री उशिरा अन्न खाऊ नये. ते पचवणं कठीण जाते.
जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आठवड्यातून एक दिवस पाणी आणि ज्यूस घेऊन उपवास करू शकता.
पाणी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकेल आणि ज्यूस तुम्हाला ऊर्जा देईल.
उपवासानंतर संध्याकाळी जड अन्न खाऊ नका. सॅलड, फळे आणि काही हलके अन्न खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
शुगर किंवा बीपीच्या रुग्णांनी रमजानमध्ये उपवास करणे योग्य आहे का?
रमजानमध्ये उपवास करायचा की नाही, हासुद्धा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आहे. मधुमेह किंवा बीपीचे रुग्ण सावधगिरी बाळगून उपवास करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. रमजानच्या काळात, जेवणामध्ये १२ते १५ तासांचे अंतर असते, त्यामुळे त्रास होऊ शकतो. साखर किंवा बीपीच्या रुग्णांना नियमित आणि वेळेवर अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.

Share