भोेंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्त्वाचा गळा घोटला- राऊतांची राज ठाकरेंवर टिका

अहमदनगर : भोंग्यांबाबत सुरु असलेल्या वादामुळे शिर्डीतील साईबाबा संस्थाननेही महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिरात पहाटे होणारी काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीच्यावेळी मंदिरावरील स्पीकर न लावण्याचा निर्णय या संस्थानाने घेतला आहे.  आजपासूनच याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. शिर्डीच्या मंदिरांवरील भोंगे बंद झाल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राऊत यांनी ट्विट करून म्हटले आहे, भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तीर्थस्थानावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्षे भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते.’ असे म्हणत राऊत यांनी याचे खापर राज ठाकरे यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

Share