औरंगाबाद दूध महासंघाच्या उपाध्यक्षपदी भूमरे गटाने मारली बाजी

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्हा दूध महासंघावर सर्वपक्षीय एकता पॅनलने विजय मिळवला आहे. यात संचालकपदी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नावावर सर्वानूमते संमती देण्यात आली आहे. मात्र उपाध्यक्ष पदासाठी इतर पक्षात चुरस निर्माण झाली होती. यावर आज निवड प्रक्रिया पार पडली. उपाध्यक्षपदासाठी एकूण तीन अर्ज दाखल करण्यात आले होते. यात एक काँग्रेस अन्य दोन शिवसेनेचे होते.

या निवड प्रक्रियेत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. या निवडणूक प्रक्रियेत सेनेचे दोन गट होते एक सत्तार गट आणि दूसरा भूमरे गट .  शिवसेनेकडून दाखल कऱण्यात आलेले दोन अर्ज हे गटबाजीतून असल्याचे स्पष्ट दिसून आले. गेल्या वेळी शिवसेनेकडे असलेले हे उपाध्यक्षपद टिकविण्यासाठी शिवसेनेतर्फे जोरदार प्रयत्न केले जात होते . यात स्वत: कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे  लक्ष घालत असून त्यांचे निकटवर्तीय नंदलाल काळे यांच्याकडे उपाध्यक्षपद होते. मात्र यावेळी नवीन चेहरा असेल, असे काही संचालकांनी सांगितले असल्याने , भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष तयारीत आहेतच मात्र नवीन उपाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज संदीपान भुमरे गटातील व्यक्तीची निवड झाली असून दिलीप निरफळ हे औरंगाबाद दूध संघाचे नवे उपाध्यक्ष असतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

Share