उदयनराजे भोसले- अजित पवार भेटीनंतर अनेक तर्क-वितर्क

पुणे- राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकारणात अनेक तर्क वितर्क लावली जात आहेत. पुण्यात झालेल्या या बैठकित साताऱ्यातील विकास कामांबद्दल चर्चा झाल्याचं म्हंटल खर मात्र या भेटीवर राजकारणात चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

२०१९ मध्ये उदयराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. यानंतर पोट निवडणूकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलं. उदयनराजे  यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी साताऱ्यातील विकास कामांविषयी आपली अजित पवारांशी चर्चा झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. अजित पवारांसोबत विकास कामांबाबत चर्चा झाली. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अजित पवारांना विनंती केली, असं ते म्हणाले.

दरम्यान वाईन विक्रीवर विचारणा केली असता, त्यांनी खोचक टिका केली ते म्हणाले की, याविषयी लोकशाही व्यवस्थेत निवडून दिलेले प्रतिनिधी उत्तर देतील. राजेशाही असती, तर मी उत्तर दिलं असतं, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत. “प्रत्येकाच वैयक्तिक आयुष्य आहे. एकदा व्यक्ती सज्ञान झाली की, काय करायचं हा निर्णय त्या व्यक्तीने घ्यायचा असतो. वाईन विक्री बंद करा किंवा सुरू ठेवा, लोकांनीच आपल्या शरीराचा आणि आरोग्याचा विचार करायला हवा”, असं देखील उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.

 

Share