भूषण कुमार अडचणीत, बलात्कार प्रकरणातील ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयाने फेटाळला

टी-सीरीज कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक आणि गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार यांच्याविरोधातील बलात्कार प्रकरणातील पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावला.

तपासादरम्यान विविध कायदेशीर बाबींमध्ये तडजोड झाल्याचे न्यायालयाने नमुद केले आहे. तक्रारदार महिलेने कायद्याचा गैरवापर केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी कायद्यानुसार या प्रकरणाचा तपास करावा अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

महिलेच्या तक्रारीवरून डीएन नगर पोलिसांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये भूषणकुमारविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणातील तक्रारदार महिलेने अंतिम अहवालाला (बी- समरी) समर्थन देत कायद्यातील तरतुदींचा गैरवापर केला हे लक्षात घेत न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाची कायद्यानुसार चौकशी करण्याचे निर्देश दिले आणि तपासावर देखरेख ठेवण्यासाठी परिमंडळाच्या पोलिस उपायुक्तांना निर्देश दिले आहेत.

महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी या महिण्याच्या सुरुवातीला समरी रिपोर्ट फेटाळला याचा तपशिलवार आदेश सोमवारी उपलब्ध करून देण्यात आला. बी-समरी नोटीस मिळाल्यानंतर महिलेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. ‘मी एक अभिनेत्री असून परिस्थितीजन्य गैरसमजामुळे भूषणकुमार यांच्यावर आरोप केले आहेत. ते मी मागे घेत आहे’ असे नमुद करीत बी-समरीला मान्यता देण्यास ना हरकत दिली होती.

काय आहे प्रकरण

दिवंगत गीतकार गुलशन कुमार यांचा मुलगा आणि टी-सीरीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आपल्या कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने तिचा गैरफायदा घेतला.

पीडितेने आरोप केला आहे की, काम देण्याच्या नावाखाली भूषण कुमारने २०१७ ते ऑगस्ट २०२० पर्यंत जवळपास तीन वर्षे तिच्यासोबत हे कृत्य केले. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आल्याचा आरोपही महिलेने केला आहे. आरोपीने तिचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.

Share