काजल अग्नवालने दिली खूशखबर! सिंघम फेम अभिनेत्रीच्या घरी बाळाचे आगमन

लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल आई झाली आहे. काजलने मंगळवारी  मुलाला जन्म दिला आहे. काजलचा पती आणि बिझनेसमन गौतम किचलूने सोशल मीडियावर बाळाच्या आगमनाची गोड बातमी देत त्याचे नाव देखील जाहिर केले आहे. काजल आणि गौतम यांनी आपल्या लाडक्या लेकाचे नाव ‘निल’ असे ठेवले आहे. सोबतच गौतमने सगळ्यांनी दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादासाठी सगळ्यांचे आभार देखील मानले आहेत. ही गोड बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि सेलेब्स काजल आणि गौतम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
काजल आणि गौतम यांनी आपल्या लाडक्या लेकाचे नाव ‘निल’ असे ठेवले आहे.

काजल अग्रवालने ऑक्टोबर २०२० मध्ये मुंबईतील ताज महज पॅलेसमध्ये उद्योगपती गौतम किचलूशी लग्न केले. या लग्नाला दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.

अलीकडेच काजलने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. व्हिडिओमध्ये काजल गुलाबी रंगाच्या लाँग ड्रेसमध्ये दिसली होती.

Share