राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबाद पोलीस आयुक्तांची मोठी माहिती

औरंगाबाद : ०१ मे रोजीच्या राज ठाकरेंच्या सभेआधीच त्याचे पडसाद आता दिसू लागले आहेत. राज ठाकरेंनी उचललेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावर आता औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.  ‘प्रार्थना स्थळांवर भोंगे लावले असतील तर त्यांनी तातडीने परवानगी घ्यावी, नियम पाळावे अन्यथा कारवाई केली जाईल’, असे आदेश निखिल गुप्ता यांनी केले आहे.

पोलीस आयुक्त गुप्ता यांनी माध्यमांना माहिती दिली. सोशल मीडियावर आमचं लक्ष आहे. काही चिथावणी खोर भाषा अथवा समाजात तेढ निर्माण होईल, असा मजकूर सोशल मिडियावर टाकणाऱ्यांवर आमचं लक्ष आहे. तसेच याबाबत नागरिकांनीही पोलिसांना माहिती द्यावी. आम्ही नक्कीच कारवाई करू, असे पोलीस आयुक्त म्हणाले. भोंग्यांबाबत आणि सर्वच ध्वनीक्षेपकांबाबत सुप्रीम कोर्टाने नियम दिले आहेत. त्या नियमांचे आता पालन करावे लागेल. त्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रार्थना स्थळांवर भोंगे लावले असतील त्यांनी तातडीने परवानगी घ्यावी, नियम पाळावे अन्यथा कारवाई केली जाईल. यासाठी काही दिवसांची मुदत त्यांना दिली जाईल, असेही आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

Share