साऊथ इंडियन सुपरस्टार अल्लू अर्जुनने नाकारली करोडोची ऑफर

साऊथ इंडियन सुपरस्टार अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्याच हृदय जिंकून घेतल आहे कारण त्याने एका तंबाखू कंपनीच्या जाहिरातीची ऑफर नाकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनला या कंपनीने करोडोंची ऑफर दिली होती. मात्र अल्लूला त्याच्या चाहत्यांमध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा प्रचार करायचा नाही. अल्लूच्या मते, जे मी स्वतः खात नाही, त्याचा प्रचार का करावा. ही जाहिरात पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्या प्रॉडक्टचे सेवन सुरु करावे, असे त्याला वाटत नाही. या तंबाखूच्या जाहिरातीमुळे चाहत्यांना त्याचे व्यसन लागू शकते, असे अल्लूचे म्हणणे आहे. चित्रपटात धुम्रपान करणे अल्लूच्या हातात नसते, परंतु खासगी आयुष्यात तो धुम्रपान न करण्याचा प्रयत्न करतो आणि ते न करण्याचा संदेशही देतो असे अल्लू अर्जुनच्या निकटवर्तीयानी सांगितले आहे.

अजय देवगण आणि शाहरुख खान पाठोपाठ अक्षय कुमारही विमल पान मसाल्याच्या जाहिरातीत सामील झाला आहे.त्याने त्याच्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितल होत, पान मसाल्याच्या कंपन्या मला करोडोची ऑफर देतात पण मी त्या जाहिराती करत नाही. त्याच्या कंमेटमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे

 

Share