भाजप नेते अतुल भातखळकर कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच राज्यातील आमदार, नेते मंडळींनाही कोरोनाची लागण होत आहे. भाजप आ. अतुल भातखळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: भातखळकर यांनी याबाबतची माहिती ट्विट करुन दिली आहे.

भातखळकर यांनी ट्विट म्हटलं की, माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल +ve आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या दोन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी. असे आवाहनही अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यांनी देखील ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तर आत्तापर्यंत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राधाकृष्ण विखे-पाटील आदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Share