भाजप नेता गौतम गंभीरला कोरोनाची लागण

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजप खा. गौतम गंभीरला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: गोतम गंभीर यांने  ट्वीट करत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे.

गौतम गंभीरने ट्विट म्हटलं की, कोरोनाची सौम्य लक्षणे सौम्य लक्षणे आढळल्यानंतर मी कोरोना चाचाणी केली. माझी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांची चाचणी करून घ्या आणि सुरक्षित रहा. असे ट्विट गंभीरने केले आहे.

गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून लोकसभा खासदार आहे. तो लखनऊ सुपरजायंट्स या नवीन आयपीएल संघाचा मार्गदर्शक देखील आहे. २०१८ मध्ये गौतम गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने भारतासाठी ५४ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-२०सामने खेळले. २००७आणि २०११विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता.

Share