चाकूर नगराध्यक्षपदी माकने तर उपनगराध्यक्षपदी बिराजदार यांची निवड

लातूरः  लातूर जिल्हातील चाकूर नगरपंचायतीवर  काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मागे टाकून भाजपाने झेंडा फडकवला.  बहुमत नसतानाही स्थानिक राजकीय समीकरणे जुळवून नगराध्यक्षपदी अपक्ष नगरसेवक कपिल माकने  तर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक अरविंद बिराजदार यांची निवड झाली.

लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन पक्षांना मिळून ८ जागा मिळाल्या आहेत तर भाजपाला ३ जागा मिळाल्या आहेत. तथापि, भाजपाने स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे जुळवून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळविण्यापासून रोखले. या नगरपंचायतीत बुधवारी नगराध्यक्षपदी अपक्ष नगरसेवक कपिल माकने तर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक अरविंद बिराजदार यांची निवड झाली. नगरपंचायत निवडणुकीत जेथे भाजपाला बहुमत मिळाले नाही तेथेही पक्ष राजकीयदृष्ट्या महाविकास आघाडीवर मात करेल, असा इशारा  भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दिला होता. त्यानुसार भाजप कार्यकर्त्यांनी चाकूरमध्ये यश मिळविले.

Share