शिवसेना-राष्ट्रवादी भूमिका बदलतात याचा भाजप साक्षीदार-शेलार

२०१७ मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीचे ठरले होते. त्यावळी घडलेल्या सर्व घडामोडींची माहिती दिली. भाजपच्या नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीला घेऊन तीन पक्षांचे सरकार बनवण्याचा विचार केला, मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सरकारमध्ये यायला नकार दिल्याचे शेलारांनी म्हटले.

पुढे शेलार म्हणाले की, भाजपला २०१७मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी असे वाटू लागले होते. शिवसेनेने रोज खिशात राजीनामे आणि तोंडात विष अशी त्रास देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप असे सरकार स्थापन करावे, याबाबत आमची चर्चा झाली होती. आमच्या दोन्ही पक्षांचे पालकमंत्री देखील ठरले होते. त्यानंतर भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ठरवले की, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी असे तीन पक्षाचे सरकार स्थापन करू, पण तेव्हा राष्ट्रवादीने याला नकार दिला. आमचे शिवसेनेसोबत जमू शकत नाही, असी राष्ट्रवादीची भुमिका होती. असा मोठा गौप्यस्फोट शेलारांनी केला.


राष्ट्रवादी भाजपसोबत येत असताना भाजपाने शिवसेनेला सोडायला नकार दिला होता. पण २०१९ ला सत्ता दिसल्यावर मात्र, शिवसेनेने भाजपला सोडण्याची भूमिका सहज घेतली. शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका कशी बदलते याचा भाजप साक्षीदार आहे. अशी टीका देखील शेलारांनी शिवसेनेवर केली आहे.

Share