हिंसक आंदोलनावर खासदार उदयनराजे भोसले आक्रमक

 

मुंबई: राष्ट्रवादी कोंग्रेसचे शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’या बंगल्यावरील एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी समर्थन केले आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत खा. उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली, “आपण जे कर्म करतो, त्याचा हिशोब याच जन्मी द्यावा लागतो” अजून काय बोलणार यावर? असं उदयनराजे भोसले यावेळी बोलले. उदयनराजे भोसले बोलताना राज्यातील सत्ताधारी पक्षांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.  जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होणार नाही, तोपर्यंत लोकशाही देशात नांदणार नाही अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली. यासोबतच बरोबर झालंच पाहिजे, करायलाच पाहिजे, अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार झाला, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

कॉँग्रेस राष्ट्रवादीने सत्तेच केंद्रीकरण केलं, काही लोकांच्या हाती सत्ता राहिली बाकीच्यांचा फक्त सोयीनुसार वापर केला, ही गुलामगिरी म्हणायची की अजून काही? असा प्रश्न ही भोसले यांनी मांडला. महाराष्ट्राने आजवर अनेक मुख्यमंत्री बघितले, भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद योग्य रित्या हाताळले, त्यावेळी शिवसेना आपल्या जागी योग्य होती. मग असे अचानक काय घडले की त्यांनी पार चिरफाड करून टाकली, असा प्रश्न उपस्थित केला गेला.

आज जी काही राजकीय अवस्था महाराष्ट्रात आहे? ती कोणामुळे? आज जे लोक सत्तेमध्ये आहेत, त्यांना ज्यांनी निवडून दिले त्यांचाच विसर पडलाय का? कारण ते आपली सत्ताटिकवण्याच्याच मागे आहेत का? मग प्रगतीचा विचार येणार तरी कसा? जर अशीच अस्थिरता वाढत गेली तर, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी सध्यस्थीतीतील असलेल्या सरकारवर निशाणा साधला आहे.

याचा परिणाम कोणाला भोगायला लागणार? तरुण पिढीवर याचा काय परिणाम होऊ शकतो? याचा ही सरकारने बारीक विचार करावा मग सत्ता कोणाचीही असो याचा परिणाम प्रगतीवर नको अशीही प्रतिक्रिया खासदार उदयन राजे भोसले यांनी दिली.

Share