शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध, औरंगाबादेतही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. याच्याच निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे.  औरंगाबादमध्येही आज याप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

औरंगाबादमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येत या हल्ल्याचा निषेध केला. शहरातील गांधी पुतळ्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचाही जोरदार निषेध करण्यात आला. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध राज्यभरात सर्वच ठिकाणी होतोय. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विविध शहरांमध्ये गुणरत्न सदावतेंचा निषेध केला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी अशाप्रकारे हिंसक होण्यामागे गुणरत्न सदावर्ते यांचे प्रक्षोभक भाषण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधीची चौकशी पोलिसांकडूनही सुरु आहे.

Share