देशात कुत्र्यामांजरांची गणना होते, ओबीसींची का नाही? आव्हाड

ठाणेः  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील ओबिसी मेळाव्यात बीसींच्या जनगणनेच्या मुद्द्यावरून प्रचंड संताप व्यक्त केला. या देशात कुत्र्या, मांजराची गणना होते. मग ओबीसींची जनगणना का होत नाही? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

आव्हाड म्हणाले की, आपल्याकडे ३५४ जाती आहेत. अनेक जातीचे लोक आले आहेत. मी स्वतःच ओबीसी आहे. मी राजकारण केले नाही. पण आपल्या बांधवांसाठी मला लढावे लागणार आहे. महाराष्ट्रात डोक्यावर छप्पर नाही असा सर्वाधिक समाज हा आदिवासी आणि भटका आहे. पण आपण मागासवर्गीय आहे हे सांगायची लाज वाटते काहींना, असं सांगतानाच मोदींना कुणी काय दिले यावर मी बोलणार नाही. पण मंडल आयोगामुळे तुमच्यातील महापौर निर्माण झाला. सोलापुरात कलाल समाजाची पहिली महापौर झाली ते मंडल आयोगामुळेच. हा दारु विकणारा समाज आहे. पूर्वी शिंप्याचे काम करायचा. बिहारमध्ये पिछडा वर्ग आहे. त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव आहे. मात्र, महाराष्ट्रात जातीबाबत ओळख नाही. हे दुर्देव आहे, असे ते म्हणाले. यावेळी आव्हाड यांनी स्टेजवर खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन पारंपारिक वेषात स्टेजवर प्रवेश केला.

https://fb.watch/b8ITlvvzLV/

आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. समाजातील शोषित आणि वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलेले आहे. शोषितांना आरक्षण मिळाले पाहिजे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी सांगितले आहे, असे सांगतानाच कुत्र्यांची गणना होते मात्र ओबीसींची जनगणना को होत नाही, असा संतप्त सवाल आव्हाड यांनी केला. शहरीकरणामुळे १०० मुलांपैकी ८ मुले पदवीधर होत आहेत, असे सांगतानाच ओबीसींमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण वाढलेले आहे, याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले. जी संघटना संविधानाला विरोध करते ते लोक तुमच्या आरक्षणाला पाठिंबा कसा काय देणार?, त्यांनी कर्नाटकात तिरंगा खाली आणला. आम्हालाही भगव्याबाबत अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला आमचा सलामच आहे.

Share