बसपा अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत

उत्तरप्रदेश :  विधानसभा निवडणूकीपुर्वी बसपाने मोठी घोषाणा केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी विधानसभा निवडणूक न लढवणाचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती बसपाचे राष्ट्रीय सचिव सतीशचंद्र मिश्रा यांनी दिली. तसेच, सतीश चंद्रा मिश्रा हेही विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

“माजी मुख्यमंत्री मायावती आणि मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. समाजवादी पक्षाकडे ४०० उमेदवार नसतील तर ते ४०० जागा कशा जिंकणार? समाजवादी पार्टी किंवा भाजपा सत्तेवर येणार नाही, बसपा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार आहे.”, असं बसपा खासदार सतीश चंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी, उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २०, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि सात मार्चला मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. कोविडमुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

Share