बिगुल वाजले… पाच राज्यातील निवडणूका सात टप्यात होणार

**नवी दिल्ली :** देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणूकीचा कार्यक्रमांची घोषाणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात पार पडणार आहेत. तर पंजाब, गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. मणिपूर राज्याच्या निवडणूका दोन टप्यात पार पडणार आहेत. १० मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री ८ नंतर निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल.

**उत्तर प्रदेश**

१४ जानेवारीला अधिसूचना जारी
पहिला टप्पा – १० फेब्रुवारी
दुसरा टप्पा – १४ फेब्रुवारी
तिसरा टप्पा – २० फेब्रुवारी
चौथा टप्पा – २३ फेब्रुवारी
पाचवा टप्पा – २७ फेब्रुवारी
सहावा टप्पा – ३ मार्च
सातवा टप्पा – ८ मार्च
निकाल कधी? – १० मार्च

**पंजाब**
८ जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
कधी मतदान? – १४ फेब्रुवारी
निकाल कधी? – १० मार्च

**उत्तराखंड**
८ जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? -एकच टप्पा
कधी मतदान? – १४ फेब्रुवारी
निकाल कधी? – १० मार्च

**गोवा**
८ जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
कधी मतदान? – १४ फेब्रुवारी
निकाल कधी? – १० मार्च

**मणिपूर**
८ जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – दोन टप्प्यात
कधी मतदान? – २७ फेब्रुवारी, ३ मार्च
निकाल कधी? – १० मार्च

Share