आमदार रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

गंगाखेड :  गंगाखेडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये गुट्टे यांच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने जप्त केली . ताब्यात घेतलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे २५५ कोटी रुपये आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, गुट्टे यांनी इतर काही जणांसोबत मिळून शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून गंगाखेड शुगर या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढले आणि तब्बल ६३५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. बँकांकडून घेतलेली कर्जे २०१२-१३ आणि २०१६-१७ दरम्यान होती. ही कर्जे वितरीत झाल्यानंतर गंगाखेड शुगरद्वारे इतर विविध खात्यांमध्ये वळती करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज काढले होते, त्यांना कधीच ते कर्ज मिळाले नाहीत.

न्यायालयाच्या परवानगीनंतर आता ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये गंगाखेड साखर कारखाना आणि २४७ कोटी किमतीची यंत्रसामग्री, इतर तीन संलग्न कंपन्यांची सुमारे ५ कोटी रुपयांची जमीन आणि डिसेंबर २०२० मध्ये यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या काही मालमत्तांचा समावेश आहे.

Share