केंद्र सरकारने जनतेची फसवणूक केली, सुप्रिया सुळेंचा आरोप, पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे : इंधन दरवाढीविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.  यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले. हनुमानाची आरती करुन राष्ट्रवादीने केंद्र सरकारचा निषेध केला आहे.

राष्ट्रवादीने आंदोलनाची सुरूवात हनुमान आरतीने केली, त्यावर पत्रकाराने, “तुम्ही देवाकडे कोणते साकडे घालणार” असे प्रश्न विचारले असता, सुळे म्हणाल्या की, आपण देवाला नको अडचणीत टाकूया, देव सगळं समजतो. केंद्र सरकारला सुडबुद्धी येऊ दे, जे ते झोपयचे सोंग घेत आहेत, नको त्या विषयावर लक्ष देत आहे, त्यावर माझी त्यांनी विनंती आहे की, देशाच्या हितासाठी पक्षपात, विचारधारा सगळं बाजूला ठेवून देशाची अर्थव्यवस्थेसाठी तज्ञांकडून माहिती घ्या, अशी विनंती सुळे यांनी केली.

देशात महागाईचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने कोट्यवधी महिलांना गॅस मोफत दिले खरे, मात्र त्या महिलांने पुन्हा आता गॅस सिलिंडर आणता येत नाही, कारण गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेऊन अनेकांनी गरिबांना गॅस मिळावे म्हणून, सबसिडी सोडून दिली. मात्र महिलांना मोफत गॅस मिळाल्यानंतर आज त्यांना ते पुन्हा भरण्यास परवडत नाही, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

पुढे त्या म्हणाल्या, गेल्या अनेक दिवसांपासून मी संसदेत महागाईविरोधात आवाज उठवत आहे, मी त्यांना तेव्हाच सांगितले होते की, महागाईचा भडका उडणार आहे. काल रिझर्व्ह बँकेने इंटरेस्ट रेट वाढवले असून, गेल्या दीड महिन्यांपासून मी संसदेत आवाज उठवत होती, मात्र केंद्र सरकारला आणि अर्थमंत्र्यांना हे कसे काय दिसत नाही? असा सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

Share