देशमुखांसारख मलिकांच होऊ देऊ नका चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

पुणे- राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने पहाटे ताब्यात घेत त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात देखील नेण्यात आले आहे. दरम्यान यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील उमटत आहे. दरम्यान या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांच्या बाबतीत सुरुवातीला खुप बोलताना दिसले. आता त्यांचा आवाज कमी झालेला आहे . आता अनिल देशमुख कोण असा ते प्रश्न विचारत आहेत. तसे मलिकांच्या बाबतीत होऊ देऊ नका, असं पाटील म्हणाले आहेत.

एखादी चौकशी सुरु असल्याने त्याच्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. सुरुवातीला आरोप केले जातात. छगन भुजबळ दोन वर्षे आत होते पण कोणत्या कोठडीत होते कोणालाचा पत्ता नव्हता. आता अनिल देशमुख कुठे आहेत हे पण माहिती नाही. त्यामुळे आरोप हे क्षीण होतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Share