कच्च्या तेलाच्या दरात घसरण, मुंबईसह तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर पाहा

मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर सर्वांसाठीच खुप जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण पेट्रोल-डिझलच्या दरांवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. कच्च्या तेलात सध्या अनेक चढ-उतार सुरू आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर आहे. या सगळ्यात आज तेल कंपन्यांनी पेट्रोेल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल- डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही.

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार, आज मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३५ रुपये तर डिझेलचा दर ९४.२२ रुपये प्रतिलिटर आहे. त्याच वेळी, पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०५ रुपये तर डिझेलचा दर ९२ रुपये प्रति लिटर आहे. तर नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.६५ रुपये तर डिझेलचा दर ९३.५८ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

Share