नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती

मुंबई : नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती. असा खळबजनक आरोप भाजप आमदार नितेश राणे एक खळबळजनक ट्विट केलं आहे.

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली. त्यावेळी त्यांना त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती. असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ट्विट करून नितेश राणेंनी हा आरोप केलाय. नितेश राणे यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरू करू असा इशाराही आमदार नितेश राणेंनी दिला आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी एक ट्विट केलं होतं. यात त्यांनी मध्यप्रदेश, गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या, अशी मागणी केली होती. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, की आता महाराष्ट्रात भगव्याचं राज्य आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातप्रमाणे आपल्याकडेही धर्मांतर बंदी कायदा आणला पाहिजे. जेणेकरून निष्पाप महिलांना फसवून, त्यांचं धर्मांतर करून त्यांचा होणारा छळ रोखला जावा.

Share