मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गजानन कीर्तिकरांच्या भेटीला; चर्चांना उधाण!

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाकरे गटातील खासदार आणि शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेतली. किर्तीकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी जावून शिंदे यांनी त्यांची भेट घेतली.

शिवसेनेचे उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे खा. गजानन कीर्तिकर हे काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरीच आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीला गेले. सगळ्यांच्या उपस्थित दोघांमध्ये चर्चा झाली. कीर्तिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. दरम्यान ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या आठवड्यात गजानन कीर्तिकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती. त्यामुळे मुंबईतील रहेजा रुग्णालयात त्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. यानंतर तीन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी कीर्तिकर याना दिलेला होता. ही शस्त्रक्रिया होऊन नुकतेच त्यांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात आली. ही बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजल्यावर शिंदे जातीने कीर्तिकरांच्य निवासस्थानी गेले. आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने त्यांची भेट घेत शिंदेंनी तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Share