मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण…

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.’ अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिल्या. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं एकनाथ शिंदे यांनी टाळलं आहे.

दरम्यान, शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

Share