मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण – नाना पटोले

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसामाध्याना दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही करोनाची लागण झाली आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी कोरोनाची लागण झाली आहेत. त्यांनी आताच कमलनाथ यांच्याशी चर्चा केली. आज दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते व्हर्च्युअली सहभागी होतील. विधानसभा बरखास्तीचा कोणताही विचार नाही, पूर्ण ताकदीने सरकार चालवणार, असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.

Share