पंजाबचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पंजाब- पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील भ्रष्टाचार विरूध्द मोठी मोहिम सुरू केली आहे.  मान यांनी भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनी राज्यात भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन क्रमांक जारी केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली आहे.

मान यांनी ट्विट केले आहे की, “भगतसिंहजी यांच्या हुतात्मा दिनी अँटी करप्शन हेल्पलाईन नंबर जाहीर केला जाईल, तो नंबर माझा पर्सनल व्हॉट्सअ‍ॅप नंबर असेल. जर तुम्हाला कोणी लाच मागत असेल, तर त्याचा व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्डिंग करुन मला पाठवा. भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. पंजाबमध्ये आता भ्रष्टाचार चालणार नाही.”

या हेल्पलाईनच्या माध्यमातून पंजाबमधील लोक व्हॉट्सअ‍ॅपवर भ्रष्टाचारासंबंधीच्या तक्रारी पाठवू शकतील असे सांगण्यात आले आहे.  जर कोणी तुम्हाला लाच मागितले तर मला त्याचे व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवा. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. पंजाबमध्ये यापुढे भ्रष्टाचार होणार नाही.इतकेच नाही तर हा नंबर खुद्द मुख्यमंत्र्यांचा असणार आहे.  हा हेल्पलाईन नंबर 23 मार्च रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे भगवंत मान यांनी सांगितले. ९९% लोक प्रामाणिक आहेत, १% लोक व्यवस्थेचा नाश करतात. मी नेहमीच प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे ते म्हणाले. आता पंजाबमध्ये हफ्ते वसुली थांबणार आहे. हफ्ते वसुलीसाठी कोणताही नेता कोणत्याही अधिकाऱ्याला त्रास देणार नाही.

Share