धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्रावर आरोप

मुंबई : गेली १७ वर्षे रखडलेल्या धारावीचा पुनर्विकासाबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाष्य केले आहे. धारावी पुनर्विकासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहे पण केंद्राकडून जागा न मिळाल्याने या प्रकल्पाला गती मिळालेली नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत बोलताना दिली आहे.

महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अर्थसंकल्पाचा  भार सोसणाऱ्या मुंबईचे पुढे रुप कसे असणार आहे हे ठरवण्याच्या द्दष्टीने माझे सरकारी काम करत आहेत. मुंबईमध्ये अनेक जण येतात त्यांना अन्न आणि वस्त मिळतं पण दिवसभर काम केल्यानंतर पाठ टेकण्यासाठी त्यांच्या हक्काची घरे मिळालीच पाहिजे हा विचार मांडला आणि त्या द्दष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज झोपडपट्टी पुर्नविकासाचे प्रकल्प सुरु झाले पण त्याची गती कासवाच्या गतीपेक्षाही मंद होती. आपण असं मानतो की आजोबा नारळाचे झाड लावतात आणि त्याचे फळ नातवाला मिळते. पण आता नातवंडाच्या पण पुढे दिवस जात आहेत. फळे लागत आहेत पण मलई कोण खात आहे हा संसोधनाचा विषय आहे. अनेक वर्षे जी लोक ट्रान्झीस्ट कॅम्पमध्ये राहत आहेत त्यांना घरे मिळवून देण्यासाठी ज्या काही योजना आपण आणल्या आहेत त्याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री उद्वव ठाकरे म्हणाले.

Share