परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला मोठा धक्का !

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश सर्वोेच्च न्यायलयाने आज महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून या मुद्यावरुन चर्चा सुरु होती. विरोधकांनी देखील वारंवार यासंदर्भात मागणी केली होती.

मात्र, महाराष्ट्र पोलिस यासंदर्भात तपास करतील, अशी भुमिका राज्य सरकारने घेतली होती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातला सर्व तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. या सुनावणीनंतर न्यायलयाने वरील आदेश दिले. नैसर्गिक न्यायाच्या तत्वासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करणं आवश्यक आहे. या प्रकपणात गुंतलेलं कुणीही स्वच्छ आहेत असं आमचं म्हणणं नाही असं न्यायमूर्तीनी यावेळी नमूद केलं आहे.

Share