मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला अवैध वाळू उत्खनन प्रकरणात अटक

पंजाब- निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. त्यातच पंजाबमध्ये राजकीय हालचाली देखील वाढल्या असून यातच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चिन्नी यांच्या पुतण्याला अवैध वाळू उत्खनन प्रकरणात ईडीने अटक केली आहे. भूपिंदर सिंग हनी याची पंजाब ईडीने आठ तास चौकशी करून प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट अंतर्गत अटक केली.

 

गेल्या महिन्यात, ईडीने पंजाबमधील मोहाली, लुधियाना, रूपनगर, फतेहगढ साहिब, पठाणकोट येथे भूपिंदर सिंग हनी आणि इतरांच्या निवासस्थानी झडती घेतली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या झडतीनंतर १० कोटींहून अधिक रोख रक्कम, वाळू खाण व्यवसायासंदर्भातली कागदपत्रं, मालमत्ता व्यवहार, मोबाईल फोन, २१ लाख रुपये किमतीचे सोने आणि १२ लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळ अशा वस्तू सापडल्या, त्या ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

Share