दिलासादायक ! राज्यात इंधन दर कमी होणार

मुंबई :  राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे.  यात नैसर्गिक वायूवरील कर ३.५ टक्के इतका केला असून यापूर्वी तो १३.५ टक्के होता. यामुळे सीएनजीच्या किंमतीत नक्की घट होणार असल्याचे संकेत यावेळी मिळाले आहेत . त्यामुळे पेट्रोल डिझेल दरवाढीची चर्चा सुरु असताना राज्यातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली होती. मुंबई आणि पुणे सारख्या महानगरात सीएनजीचा दर ६३ ते ६६ रुपयांच्या दरम्यान आहे. घरगुती वापराचा पाईप गॅस आता ३६ ले ३८ रुपये किलो आहे. जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२२ या कालावधीत सीएनजी सुमारे १८ रुपयांनी महागला आहे. एक जानेवारी २०१८ रोजी सीएनजीचा दर ४७.५० रुपये होता. तो दर आता ६६ रुपयांवर आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर आर्थिक भार वाढला आहे.

अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या घोषणा

मुंबई प्रमाणे राज्यात इतर ठिकाणी एसआरएसाठी १०० कोटी रुपयांचा निधी

हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील.

तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार

आरोग्य विभागासाठी ११ हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार.

एसटी महामंडळ ३ हजार नवीन बस देणार आहेत

महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केली आहे.

कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर देणार.

Share