पुण्याला गुणीले आणि…,शेलारांचा अर्थसंकल्पावरून मविआला टोला

मुंबई-  आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. काल विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला.यावर भाजपकडून वेगवेगऴ्या प्रतिक्रिया येत आहेत. आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

शेलारांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारने मांडलेला आजचा अर्थसंकल्प पंच सूत्री नसून तो मांडल्यानंतर लक्षात येत आहे. अतिशय पाणचट , पचपणीत आणि प्रतिगामी आहे. हा स्व राज्याचा अर्थसंकल्प वाटत नसून स्व हिताचा अर्थसंकल्प जास्त वाटत आहे. शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काहीही मिळालेल नाही. कोरोना काळात शेतकरी खासगी सावकाराकडे गेला आणि सावकारी कर्जही वाढल आणि कर्जदारही वाढले आहेत. पण शेतकऱ्यांना मदत करायची सोडून खासगी सावकारीवर चकार शब्द यावेळी काढला नाही. अर्थसंकल्प राज्याचा पण त्यामध्ये जिल्हा नियोजनाच्या निधीवर सुध्दा डल्ला मारल्याचा दिसत आहे. असे आरोप शेलारांनी यावेळा केले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की , पुण्यातील आवश्याक असलेल्या प्रकल्पांना निधी दिला गेला पण मुंबईतील प्रकल्पांना भोपला मिळाला आहे.  पुण्याच्या विरोधात आम्ही नक्की नाहीत पण पुणे जिल्ह्याचा विचार केला जातो तर मुंबईचा का नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 300 एकर जागेत मेडिकल सिटी येतेय की जागा बघून त्यात मेडीकल सिटी निर्माण केली जातेय यात देखील शंका आहेत. मागासवर्ग आयोगाला देखील निधीची ठोस तरतूद करण्यात आलेली नाही . त्यामुळे हा स्वहिताचा अर्थसंकल्प आहे. अशी टिका आशिष शेलार यांनी यावेळी केली आहे.

 

Share