विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे आंदोलन

औरंगाबादगेल्या आठवड्यात विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षांचा गोंधळ पाहायला मिळाला होता. ऐनवेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंनी वाढल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला आल्यामुळे एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ परीक्षा केंद्र संचालकांवर आली. त्यांनतर पेपर पुढे ढकलण्यात आले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पदवी परीक्षेबाबत सुरु असलेला गोंधळ थांबता थांबत नसल्याचे दिसत आहे. आता विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात आज विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात आंदोलन सुद्धा केले. तसेच परीक्षा एक महिन्यांनी पुढे ढकलण्याची मागणी सुद्धा केली. यावेळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल आहे की, विद्यापीठाने दिलेल्या सूचनानुसार 21 -22 अकॅडमिक कैलेंडर ठरवलं गेलं होतं. मात्र या पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू झालेच नसून, पेपर सुद्धा झाले नाही. 45 दिवसाचे अभ्यासक्रम 35 दिवसात संपले. ज्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या युनिट टेस्ट द्यायच्या होत्या, सबमिशन्स करायचे होते, प्रोजेक्ट तयार करायचे होते, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन चा अभ्यास करायचा होता, असाइनमेंट लिहायच्या होत्या, विद्यापीठ संलग्न रिपोर्ट देखील तयार करायचे होते.मग एवढ्या कमी वेळेत हे सर्व करून अभ्यास कधी करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

Share