बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे काँग्रेसचा कट,भाजप आमदाराचा खळबळजनक आरोप

कर्नाटक-  दोन दिवसांपूर्वी कर्नाटकच्या शिवमोग्गा गावात बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान परिसरात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे, तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या हत्ये मागे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असताना, भाजपचे आमदार एम.पी. रेणूकाचार्य यांनी या हत्येमागे काँग्रेसचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

२६ वर्षीय तरूणाची रविवारी रात्री कर्नाटकच्या शिवमोग्गा भागामध्ये हत्या करण्यात आली. तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली असून रेणुकाचार्य यांनी  कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी दिली आहे.

आता पर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली जात असल्याचे देखील ज्ञानेंद्र यांनी सांगितले आहे.

Share