काँग्रेसचं ठरलं! चिन्नी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार

पंजाब- पंजाब विधानसभा निवडणूकीत काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरु होती. विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चिन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू या दोघांमधून कोण असणार यावर सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र काँग्रेसचे नेते राहूल गांधी सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पंजाब मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा केली. यात चरणजित सिंग चिन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अखेर पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा घोषित केला. चरणजित सिंग चन्नी हे काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील. राहुल म्हणाले की, चन्नी गरीब घरातील आहेत, त्यांच्यात अहंकार नाही. तीन महिन्यांच्या कालावधीत ते सर्व पंजाबच्या नागरिकांनी पाहिले आहे. चन्नी हे गरीब लोकांसाठी काम करतात.  राहुल यांनी सिद्धू आणि सुनील जाखड यांचेही कौतुक केले. काँग्रेसकडे अनेक हिरे असल्याचे सांगितले. यापैकी एक हिरा निवडने सोपे नव्हते, असे राहूल यांनी सांगितले.

पुढे राहुल म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण असावा याचा निर्णय आज घेण्यात यावा, असे मला सांगण्यात आले. हा माझा निर्णय नसून हा पंजाबचा निर्णय आहे. मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मी पंजाबच्या जनतेला विचारले आहे . तरुणांना विचारले, उमेदवारांना विचारले, कार्यकर्त्यांना विचारले त्यांनी मला सांगितलेला निर्णय आज मी तुम्हाला सांगितला आहे. असे काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी सांगितले.

Share